एक्स्प्लोर
Advertisement
रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
औरंगाबाद: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पैठणमधील सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. कारण की, आता दानवेंविरोधात शिवसेनेनंही दंड थोपटले आहेत. औरंगाबादचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांनी दानवेंविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केल आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेंद्री यांनी आज मुंबईत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तक्रार केली आहे. तसेच दानवेंवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेनच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याविरोधात दंड थोपटले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण:
पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
लक्ष्मी देवाचं नाव, ते उच्चारल्याने आचारसंहितेचा भंग कसा? : दानवे
रावसाहेब दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement