शिवराज दिवटे मारहाण प्रकरण! धनंजय देशमुख यांनी रुग्णालयात घेतली शिवराजची भेट
धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तसेच त्याला आपण सोबत असल्याचे देखील सांगितले.

Shivraj Divate assault case Beed : परळीतील शिवराज दिवटेला शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका टोळक्याने डोंगराळ भागात नेत बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण करत शिवराज दिवटे या तरुणाला गंभीर जखमी केले आहे. सध्या त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज रुग्णालयात जात धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेतली आहे. धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तसेच त्याला आपण सोबत असल्याचे देखील सांगितले. यावेळी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे देखील उपस्थित होते.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली होती. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे (Shivraj Divte) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी शिवराज दिवटे याने 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे सांगितले. तसेच टोळक्यातील काहीजण, 'याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ', असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले.
मी जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो, जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहायला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे मारणाऱ्यांना माहिती होते.पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, 'याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा'. ते मला मारून टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती,लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फुटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असे शिवराज दिवटे याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
Beed Crime news: याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा! बीडच्या शिवराज दिवटेला लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण, डोक्यात बाटलीही फोडली पण....
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या






















