एक्स्प्लोर

Sambhaji Bhide : संभाजी भिडे पुन्हा बरळले, डॉक्टर XXXXX, मारायच्या लायकीचे...

Sambhaji Bhide latest News : शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्तानचे सर्वेसर्वो संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हं आहेत. संभाजी भिडे यांनी डॉक्टरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Sambhaji Bhide : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याआधी न्यायाधीशांवर वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. 

संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात १०५ टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले. 

संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले.

पाहा : संभाजी भिडे पुन्हा बरळले, डॉक्टरांवर केलं वादग्रस्त वक्तव्य

न्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य 

संभाजी भिडे यांनी या आधीदेखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जवळपास एक महिनाभरापासून त्यांनी न्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असे भिडे यांनी म्हटलं होतं. 

वाईनला परवानगी देण्याच्या निर्णयावरुनही हल्लाबोल

राज्य सरकारने वाईनला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, समाजाला हानिकारक असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता असेही भिडे यावेळी म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध

संभाजी भिडे यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलीत. त्यांनी केलेली अनेक भाषणं वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. संभाजी भिडे यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर भीमा-कोरेगाव दंगल पेटली असल्याचा आरोप झाला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेड ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेड ड्रामा
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Embed widget