एक्स्प्लोर

ईडीचे लोण छोट्या गावापर्यंत! झेडपी सदस्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी ईडीने करावी, मनसेच्या पोस्टर्सची बीडमध्ये चर्चा

नांदूरघाटच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संपत्तीचे ईडीने चौकशी करण्याची केली मागणी करताना त्यासंबंधी सर्व गावभर पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

बीड: मागच्या काही दिवसापासून ईडी ज्या प्रकारे कारवाई करते आहे त्याची राज्यभर चर्चा आहे. ईडीची कारवाई जरी मोठ्या शहरापुरती मर्यादित असली तरी त्याची चर्चा आणि परिणाम आता छोट्या गावांमध्ये पाहायला मिळतायेत. बीडच्या नांदुरघाट परिसरामध्ये तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी ही थेट ईडीने करावी असे  बॅनर्स मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी लावले आहेत. त्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.

...म्हणून ईडीने चौकशी करावी ही मागणी
नांदुरघाटमधील विकास काम करताना कोट्यावधी रुपयांची अनियमितता झाल्याची तक्रार यापूर्वीच सुमंत धस यांनी केजच्या तहसिलदाराकडे केली होती. याच मागणीसाठी सुमंत धस यांनी काही दिवसांपूर्वी नांदुरघाटमध्ये उपोषण केले होते. या उपोषणा वेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले कुठे मात्र त्याचा पुढे काहीच उपयोग झाला नाही असं सुमंत धस यांचे मत आहे. म्हणूनच सुमंत धस यांनी आता या कामांची चौकशी ईडीने करावी अशी मागणी केली आहे.

बॅनरवर काय लिहिलंय? 

ED/ ईडीने थोडं लक्ष,
आमच्या नांदूरघाट सर्कल मध्ये पण घालावं
मोठे माशे जाळ्यात अडकत आहेत पण लहान माशे पण करोडोंचा भ्रष्टाचार करून माला-माल झाले आहेत.
नांदूरघाट सर्कल मध्ये मागच्या 5 वर्षात 100 करोड़ पेक्षा जास्त रुपयांची कामे झाली,
पण प्रत्यक्षात मात्र कुठे कामे दिसत नाहीत.
नांदूरघाट गावा अंतर्गत 600 मीटर रस्ता साठी 5 कोटी रुपये खर्च करून काम चालू आहे ते पण प्रचंड प्रमाणात बोगस. पाणी पुरवठा योजने साठी 2 ते 3 कोटी रूपये खर्च करून पण नांदूरघाट गावाला पाणी विकत घ्यावे लागते. 
नांदूरघाट थे जिल्हा परिषद सदस्य याचा असा कोणता व्यवसाय आहे की त्यातून 2 करोड रुपयाचे घर व कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे का भ्रष्टाचाराचा पैसा आहे.
ED/ई डी ने नांदूरघाट सर्कल मध्ये झालेल्या कामांची पण चौकशी करावी कारण पैसा शासनाचा आहे. 
करोडो रूपये खर्च करून पण कोसो दूर विकास सापडत नाही.
नांदूरघाट मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचारा वर आवाज उठवावा अश्या विनंती चे पत्र किरीट सोमय्या यांना पाठवणार करोडो रुपयांचा विकास कुठे हरवला याची चौकशी करावी.
नांदूरघाट सोबतच शिरूर,नाहोली,सांगवी या गावांमध्ये दर्शनीय भागात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी असे बॅनर्स लावले आहेत..

नांदुरघाट जिल्हा परिषद सर्कल मध्ये पाच वर्षात शंभर कोटीची कामे झाली आणि सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ते या संदर्भातली सगळे पुरावे किरीट सोमय्या यांच्याकडे सोपवणार असल्याचेही सुमंत धस यांनी सांगितलं आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget