एक्स्प्लोर

एसटीमध्येही विमानाप्रमाणे स्वागत होणार, प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी'; भरत गोगावलेंची मोठी घोषणा

Shivneri Sundari In Mumbai Pune Shivneri Bus : प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता त्यांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देण्यात आल्या.

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका 'शिवनेरी सुंदरी' नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे  प्रतिपादन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले. 
 
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. 

आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे. 

मूल व धारणी येथे नवे आगार निर्माण होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा             

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
 
उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना  या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 27 OCT 2025 : ABP Majha
Satara Doctor Case : Ranjitsinh Nimbalkar यांच्यावर Mehboob Shaikh यांचे गंभीर आरोप
Pune Protest: 'एक तारखेपर्यंत निर्णय नाही, तर आंदोलन', माजी आमदार Ravindra Dhangekar यांचा इशारा
Maharashtra LIVE Superfast News : 5 PM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 27 OCT 2025 : ABP Majha
Devendra Fadnavis : ठाकरेंना कुबड्यांचा अर्थ कळत नाही, मित्र म्हणजे कुबड्या नसतात;फडणवीसांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडीच फोडली; अधिकाऱ्यांनी केला खुलासा
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडीच फोडली; अधिकाऱ्यांनी केला खुलासा
क्लीनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही, खासदार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला लावत असेल तर तो खूनच, त्यात खासदाराचा सहभाग असू शकतो; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
क्लीनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही, खासदार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला लावत असेल तर तो खूनच, त्यात खासदाराचा सहभाग असू शकतो; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
Justice Surya Kant: न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश होणार; बीआर गवईंकडून शिफारस, 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार
न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश होणार; बीआर गवईंकडून शिफारस, 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार
सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; दिपालीचे आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य
सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; दिपालीचे आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य
Embed widget