एक्स्प्लोर

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणूक; वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पॅनेल करून लढणार 

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित स्वतंत्र पॅनेल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ‘वंचित बहुजन विद्यार्थी विकास आघाडी’ असे या पॅनेलचे नाव असेल.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येक गावात कार्याकर्त्यांचे जाळे असून पदवीधरांपर्यंत पोहोचून आम्ही आमची भूमिका मांडणार असल्याचा माहिती वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. क्रांती सावंत यांनी दिली. वंचित बहुजन विकास आघाडीच्या इस्लामपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्वतंत्र पॅनेल करून अधिसभा लढवण्याचा निर्णय झाला. विद्यापीठाची निवडणूक लढवण्याची सूचना ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्यानुसार स्वतंत्र पॅनेल करण्यात येणार आहे.

सिनेट निवडणुकीसाठी शिव शाहू आघाडी

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ़ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठाचा सर्व कारभार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या हितासाठी पारदर्शी व स्वच्छ व्हावा, हा शिव-शाहू आघाडीचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा त्यांचे वेळेवर निकाल लावणे, विद्यापीठाचा कारभार भ्रष्टाचार विरहित असणे, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधांचा विस्तार, विद्यापीठाच्या सर्व संसाधनांचा पर्याप्त वापर करणे, विद्यापीठाची स्वाययत्ता अबाधित राहणे, नविन शैक्षणिक धोरणातील सर्व सामान्य विद्यार्थी विरोधी तरतुदींना विरोध, शिक्षणाचे खासगीकरण व नफेखोरीत विरोध, विद्यार्थ्यांवरील भरमसाठ फीवाढ धोरणाला विरोध, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरणे, महाविद्यालयांच्या एकत्रीकरणास विरोध तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेची व संविधानातील मूल्यांची जपणूक शिवाजी विद्यापीठात व्हावी या सर्व मुद्द्यावर शिव-शाहू आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget