Shiv Jayanti 2023 live updates : शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री उपस्थित...
Maharashtra Shiv Jayanti Celebration : छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
Shiv Jayanti 2023 : बीड शहरातील डॉक्टर भीमराव पिंगळे महाविद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य अभिषेकाचा देखावा साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश परिधान केलेल्या या विद्यार्थ्यांनी स्वराज्याची शपथ घेतानाचा देखावा साकारल्याने हा देखावा बघण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. लंडन येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथिल संसद चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र साजरी केली जातेय. परभणीत सुदर्शना कच्छवे आणि तिच्या सहकारी कलाकारांनी 5 दिवस सतत काम करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना वंदन केले आहे. तब्बल 3100 चौरस फुटांत राजमुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ असलेली रांगोळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शहरातील गांधी पार्कमध्ये ही अतिशय देखणी प्रतिकृती या कलाकारांनी साकारली असून यासाठी 500 पोते रांगोळी या कलाकारांना लागली आहे. शिवरायांसह त्यांचे अष्टप्रधान मंडळ असलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली आहे.
Shiv Jayanti 2023 : धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी हातात मशाल घेऊन औरंगाबादमधील क्रांती चौक येथे शिवरायांची आरती केली. त्यांनी हातात मशाल घेऊन शिवरायांना अभिवादन केले. यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. चंद्रकांत खैरे यांनी सर्व शिवप्रेमींना आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
Maharashtra Beed Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं असून यावेळी त्यांनी भगवा ध्वज फडकून शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मानवंदना दिली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Maharashtra Beed Shiv Jayanti 2023 : बीडच्या गेवराई येथील न्यू हायस्कूल शाळेमधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारून शिवजयंती साजरी केली आहे. पार्थ पांचाळ या विद्यार्थ्यांना ही कलाकृती साकारली असून यासाठी फुलांचा आणि रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. यावेळी साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
Shiv Jayanti 2023 : आजपर्यंत तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉलपेपर मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवत असाल. परंतू, ठाण्यातील एका चित्रकाराने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मोबाईलच्या स्क्रीनवर रेखाटून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही कलाकृती ठाण्यातील चित्रकार अविनाश पाटील यांनी रेखाटले असून त्यांना हे चित्र रेखाटण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला आहे.
Maharashtra Beed Shiv Jayanti 2023 : बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून सर्व धर्म समभावाची मिरवणूक काढून एकतेचा संदेश देण्यात आला आहे. बिडकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या पालखी मिरवणुकीमध्ये सर्व धर्मांचे धर्मगुरू सहभागी झाले होते तर मिरवणुकीच्या वेळी बीड शहरातील वेगवेगळ्या शाळेतील मुलं पारंपारिक वेशभूषा परिधान करून या मिरवणुकीत सहभागी झाले होते. एकतेचा संदेश देण्यासाठी बिडकरांच्या वतीने यावर्षी या अनोख्या शिवजयंतीच आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये शाळेतील मुलांनी तयार केलेले वेगवेगळे देखावे लेझीम पथक त्याचबरोबर साहसी खेळाचे प्रात्यक्षिक देखील यावेळी लहान मुलांनी करून दाखवलं.
Shiv Jayanti 2023 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा
विखेंच्या लोणी गावात 34 वर्षांपासून एक गाव एक शिवजयंती उत्सव
लेझीम पथक, सैनिकी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या परेडने सर्वांच लक्ष वेधले....
छत्रपती शिवाजी महाराजांची सपत्नीक विखेंनी केली आरती..
Shiv Jayanti 2023 : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पतंजली योग समिती आणि युवा भारतच्या वतीने सुर्यनमस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सशक्त निरोगी आणि बलशाली भारत निर्मितीसाठी 21 हजार सुर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण केला.
CM Eknath Shinde : छत्रपती शिवरायांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. संभाजीराजे छत्रपती आपण केलेल्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली आहे. कोणत्याही शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही. यावेळी नियोजनात काही त्रुटी राहून गेल्या असतील, यापुढे या त्रुटी राहणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आपण सुचना करा, त्याचा विचार करुन अमंलबजावणी केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
Shiv Jayanti 2023 : संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर हा शिवाजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या गाथा मधील हा एक महत्त्वाचा प्रतापगड किल्ला म्हणून मानला जातो.
Shiv Jayanti 2023 : आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी औरंगाबाद येथून शिभक्त निघाले आहेत. या शिवभक्तांनी ट्रेनमध्ये रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिजन्मोत्सव साजरा केला.
Shiv Jayanti 2023 : संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर हा शिवाजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या गाथा मधील हा एक महत्त्वाचा प्रतापगड किल्ला म्हणून मानला जातो.
Shiv Jayanti 2023 : शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्यानं आपण शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याचे अमोल कोल्हेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेले की, आपण गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय.
Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. आज शिवजयंती असल्याने बारामती येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी सुरू केली आहे.
Nagpur : शिवजयंतीच्या निमित्ताने नागपूरातील महाल परिसरात "शिवतीर्थ" शिवाजी चौकात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जात आहे. सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करून आरती करण्यात आली. थोड्याच वेळात ढोल ताशाच्या निनादात उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाईल.
Shiv Jayanti 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः भाजपबद्दल बोलायचे झाले तर मुंबईतील बीएमसीच्या एकूण 227 वॉर्डांमध्ये 300 हून अधिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकारे महाराष्ट्राशी निगडित महापुरुष आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती, त्यामुळं राज्यातील भाजपची प्रतिमा मलीन होत होती. अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून भाजप आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
Shiv Jayanti 2023 : शिवजयंती उत्सवा निमित्त कळंबोलीमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवप्रेमी साठी देखाव्याचे आयोजन केले आहे. वाघ नखाची प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे. अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघ नखांची प्रतिकृती येथे तयार करण्यात आली आहे. यामध्ये दीडशे किलो वजनाची आणि 7 फुट उंच वाघनखेची प्रतीकृची तयार करण्यात आल्याने शिवप्रेमी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कळंबोली मधील घाटी मराठी संघटना यांच्यातर्फे या वाघनख्यांचा देखावा तयार करण्यात आला आहे. इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशाने घाटी मराठी संघटने दरवर्षी ऐतिहासिक देखावा शिवजयंती निमित्त साकारला जातो.
आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह... राज्यभरात अनेक कार्यक्रमांच आयोजन... राज्यभरात बाईट रॅली, पारंपारीक वेषभुषेत शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा आयोजन... शिवनेरीवरही शिवजयंतीचा महोत्सव
शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा महोत्सव... शिवसन्मानाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोजावणार... मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार... सकाळी 9.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरूवात होणार... यावेळी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल होतील..
- शिवनेरी : किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज फडकलाच पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भगवा झेंडा खांद्यावर घेत “भगाव जाणीव आंदोलन” करत आहेत... सकाळी 7.30 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी जमून तिथून ते गडावर जाणार आहेत...
आग्रा – आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी होणार आहे... विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाण आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवासाठी हजारोशिवप्रेमी जमनार आहे... या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे... या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून या वेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे... आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीन करण्यात आलाय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित नांदेड मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली. गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यँत ही मशाल रैली काढण्यात आली. महिला आणि मुलींनी हाथात मशाली घेऊन या रॅलीत मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता .. रॅलीचा समारोप झाल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिवे लाऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव आणि विद्युत रोषणाईने पुतळा परिसर उजळून निघाला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळ ( विले पार्ले येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा) येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात असताना आता साताऱ्यातील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.या मशाल महोत्सवाची पहिली मशाल सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पेटवण्यात आली.ढोल-ताशांचा कडकडाट आणि तुतारीचा निनाद यामध्ये संपूर्ण अजिंक्यतारा परिसर हा दुमदुमून निघाला होता. या मशाल महोत्सवाला शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावली
तब्बल 2 वर्षाच्या कोरोना काळातील निर्बंधानंतर यंदा सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जातेय. शिवजयंती उत्सव मंडळ नायगाव, पोलीस वसाहत बीडीडी चाळ 11 व 12 येथे, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त साहसी खेळांचं आयोजन करण्यात आले आहे. दांडपट्टा, तलवारबाजी, यांसारख्या मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलेय. लहान मुलांना शिवकालीन खेळांचं, इतिहासाचं महत्व समजावं यासाठी मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आलं. चित्तथरारक अशा खेळांचं सादरीकरण पाहण्यासाठी थनिकांनी गर्दी केली होती.
शिवाजी महाराजांच्या स्मारक असलेल्या किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी. रायगड प्राधिकरण प्रमाणे राज्यातले गड दुरुस्त करायला सुरुवात करा. पैसे द्यायची इच्छा नसेल तर फोर्ट फेडरेशन आहे
नाशिकमध्ये 40 किल्ले तरी आपण किती पैसे खर्च केले? असा सवाल छत्रपती संभाजी महाराज यांनी उपस्थित केला.
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त माजलगावात पंचवीस हजार स्क्वेअर फूट जागेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आली आहे. बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग करण्यात आला. माजलगावमधील सुंदर रावजी सोळंके महाविद्यालयाच्या रनिंग ट्रॅकवर 25000 स्क्वेअर फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आली आहे. यासाठी 50 क्विंटल रांगोळी वापरण्यात आली आहे.
Maharashtra Washim Shiv Jayanti 2023 : उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती राज्यासह देशभरात साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्त आपल्या राजाप्रती भावना व्यक्त करत असतो. अशाच वाशिम जिल्ह्यातील एका अभिषेक जाधव नामक कलाकार मावळ्याने शिवजयंतीच्या पूर्व संध्येला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा टरबुजावर कोरून आपल्या कलेतून महाराजांना अभिवादन केलं आहे.
Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अहमदनगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य अशा रांगोळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात आलंय. या ठिकाणी 35 बाय 40 फूट अंतराची रांगोळी प्रमोद उबाळे यांनी काढली आहे. स्मारक परिसरात अनिल वाघ इंद्रप्रस्थ स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी तलवार, दानपट्टा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिके सादर केली. अगदी लहानग्यांपासून ते युवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली. उद्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मिरवणुकीत अशी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे. ही रंगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. अतिशय रेखीव आणि आकर्षक दिसणारा हा पुतळा बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या बस स्थानकाजवळ आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी सजावट सध्या सुरू आहे. आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याचंच बीडच्या हौशी छायाचित्रकार शिवराज माने यांनी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलं आहे.
Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या परभणी शहरातील कलाकारांकडून तब्बल 3100 स्क्वेअर फूट रांगोळीतून शिवाजी महाराजांसह अष्ट प्रधान मंडळ साकारले आहे. याचे ड्रोन द्वारे केलेले छायाचित्रण करण्यात आलं आहे.
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोली जिल्ह्यातील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुतळा परिसरामध्ये लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण पुतळा परिसर उजळून निघाला आहे. हीच डोळ्यांची पारणे फेडणारी दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या साहाय्याने टिपली आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे हिंगोलीचा शिवाजी चौक परिसर उजळून निघाला होता.
Shiv Jayanti 2023 : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याठिकाणी भेट दिली. यादरम्यान त्यांनी शिवकालीन बाजारपेठेतून टाेपली खरेदी केली. तसेच तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत स्वत: फेर धरत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या साेहळ्याला माेठ्या जल्लाेषात सुरुवात झाली.
पार्श्वभूमी
Shiv Jayanti 2023 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरा-शहरांत शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. या दिवशी समाजाच्या सर्व स्तरांतून शिवभक्त शिवरायांना मानवंदना देतात. या दिवशी त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. गावखेड्यांपासून शहरांत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शिवभक्त शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात.
आग्रा येथील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार
या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'दिवाण-ए-आम' सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे. या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र, सामाजिक संस्थांनी या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
मराठ्यांच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा व्हावा अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे.
शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात
या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून, यावेळी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात येणार आहे. आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून, सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात आयोजकांनी तयारी केली असून, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एक स्वतंत्र लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शिवजयंती निमित्ताने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी गल्ली शिवजयंती निमित्ताने दुमदुमून जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गल्ली ते दिल्ली साजरी होणार शिवजयंती; शिवभक्तांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा प्लॅन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -