एक्स्प्लोर

गल्ली ते दिल्ली साजरी होणार शिवजयंती; शिवभक्तांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा प्लॅन 

Shivaji Maharaj Jayanti 2023 :  गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि आता शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिंदे फडणवीसांनी घोषणा केलेली आहे

Shivaji Maharaj Jayanti 2023 :  गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि आता शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिंदे फडणवीसांनी घोषणा केलेली आहे. त्यानुसार विविध प्लॅन तयार केले आहेत. गल्ली ते दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळणार आहे.नेमकं शिंदे फडणवीस सरकार काय करणार ?  

19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस!  महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचा राज्यभर सोहळा साजरा केला जातो. यंदा हा सोहळा राज्यसह आग्राच्या किल्ल्यावरही पहिल्यांदा साजरा होणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम  मध्ये देखिल शिवजयंती साजरी होणार आहे.  त्याचबरोबर राज्यात प्रत्येक शहरात आणि शहरातील प्रत्येक वॉर्डात शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि त्यानुसार तयारी करण्यात आलेली आहे. यावरून आता राजकारण सुरु झालंय….

दिल्ली ते गल्ली कशी असेल शिवजयंती

राज्य सरकारच्या वतीने  शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाणार आहे.  इतिहासात पहिल्यांदाच आग्र्यातही किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे. राज्यात प्रत्येक शहरात शिवजयंतीच आयोजन करण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डात  शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शिवजयंती साजरी करत असताना अनेक उपक्रम देखील राबवले जाणार आहेत.

 यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठा उत्साहात शिवजयंती सरकारच्या वतीने  साजरी केली जाणार आहे.  सर्वत्र महाराज यांची 393 वी जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे राज्यभर शिवजयंती साजरी होत असताना ऐतिहासिक अशा आग्र्यात ही शिवजयंती साजरी व्हावी यासाठी काही सामाजिक संस्थांकडून आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकार कडे विनंती करण्यात आली होती. या विनंतीला मंजुरी देत सरकारने आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम वर शिवजयंती सोहळ्याला परवानगी दिली आहे. दिल्लीतील आग्रा ते राज्यातील प्रत्येक गल्लीत उत्साहात शिवजयंती साजरी होणार आहे.

 मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाकडून तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी  शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महाजयघोष करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्ताने राज्यभरात  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी  गल्ली शिवजयंती निमित्ताने दुमदुमून जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
सर्व काही ठीक, लढाई सुरुच राहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमका काय झाला निर्णय?
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
शरद पवारांसोबत तब्बल 40 मिनीटे चर्चा, इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर, 40 मिनिटात नेमकं काय घडलं? 
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget