एक्स्प्लोर

युती-आघाडीची चिंता न करता कामाला लागा, उद्धव ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना आदेश

'माझं गाव कोरोनामुक्त गाव' ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखान राबवावी. महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या, अशा सूचना जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत.  

मुंबई : शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आदेश दिले आहेत.

शिवसेनेची स्वबळाची तयारी?

युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना असे आदेश देऊन शिवसेनेनं स्वबळाची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसतंय. येत्या वर्षभरात 20 महापालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 300 नगरपालिका तसेच 325 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. ही जवळपास विधानसभेची रंगीत तालीमच असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी युती किंवा आघाडी होईल किंवा नाही, या काळजीत न पडता पूर्ण ताकदीनं तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि केंद्र सरकारची असलेली वक्रदृष्टी बघता कुठल्याही स्थितीला सामोरं जाण्यासाठी सत्तेत असतानाच पक्षाचीजोरदार बांधणी करण्याची शिवसेनेची तयारी दिसत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचण्यासाठी शिव संपर्क मोहीम सुरू करा, असा आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिव संपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलै पार पडणार आहे. 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखांनी राबवावी. महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या, अशा सूचना शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना मुक्तीचा कार्यक्रम राबवा. सत्तेच्या काळात पक्ष बळकट करण्याचा कार्यक्रम राबवा, अशाही सूचना शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांना देण्यात आल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

Embed widget