Prataprao Jadhav दिल्ली : केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी एक स्तुत्य निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. यात त्यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलाय. आपल्या देशात मरणोत्तर अवयदान करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे. हा टक्का वाढणे गरजेचा असून आपण ही मरणोत्तर अवयवदान  करण्याचा संकल्प  केला आहे, असे म्हणत नवं नियुक्त खासदार आणि केंद्रीय आयुष व  कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी हा संकल्प जाहीर केलाय. केंद्रीय मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा संकल्प जाहीर केलाय.


मरणोत्तर अवयवदानाचा केला संकल्प


देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार आहे. गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे. येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा लाभ उत्तमरीत्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्य दृष्टीने काम करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 


प्रतापराव जाधव शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार


नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींबरोबर महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर महाराष्ट्रातून आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवलेंनी केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळवण्याची हॅटट्रीक केली आहे. यापूर्वी 10 वर्ष सामाजिक न्याय खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते.


दरम्यान, शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी पहिल्यांदाच राज्यमंत्रिपद मिळवले आहे. ते शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांना केंद्रीय आयुष व  कुटुंब कल्याण मंत्री म्हणून पद मिळाले आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या