जळगाव : रेल्वे अंडरपास (Railway Underpass) बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर असोदा (Asoda) गावच्या ग्रामस्थांनी परिवारास नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन (Agitation) केले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात आसोदा गावाच्या लगत रेल्वे महामार्ग आहे. या रेल्वे मार्गावरून ग्रामस्थांनी रुळ ओलांडून जाऊ नये, यासाठी रेल्वेकडून अंडरपास बोगदा करण्यात आल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काल रात्री या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यानंतर या बोगद्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि पाणी साचले होते. 


चिखलात फसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू


सकाळच्या सुमारास गावातील शेतकरी सुकलाल माळी हे या बोगद्यातून बैलगाडी घेऊन जात असताना त्यांचे बैल चिखलात फसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बैलांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना सुकलाल माळी हे देखील त्या चिखलात फसून मरण पावल्याचे दुर्दैवी घटना घडली. 


मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी 


याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच संपूर्ण ग्रामस्थांनी रेल्वे अंडरपास बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. याबाबत रेल्वेचे अधिकारी सध्या ग्रामस्थांसोबत चर्चा करत आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या 


हाय प्रोफाईल डॉक्टर फरार, पोलिस तपास संशयात?; मृत ऋचासाठी सोशल मीडियातून आवाज, खा. प्रणिती शिंदेंची भेट घेणार


मोठी बातमी: 4 बांगलादेशींनी मुंबईत मतदान केल्याची माहिती, मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या!