MLA Disqualification Case Verdict  : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने आणि ठाकरेंच्या बाजूने लागणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्याचवेळी ठाकरे गट जर या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये याचीही खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या गोटातील चिंता वाढल्याचं दिसून येतंय. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुनावणीच्या वेळी केलेल्या चुका हेरून हा निकाल देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात जाणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

सर्वोच्च न्यायालयात कोणतीही अडचण येणार नाही

हा निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयात कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या विरोधात हा निकाल गेल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात जातील. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर त्यांना आणि महायुतीच्या सरकारला कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती आहे.

अध्यक्षांना कोणत्याही परिस्थितीत आज निर्णय द्यावाच लागेल

असं म्हटलं जात होतं की विधानसभा अध्यक्ष आजचा निकाल राखून ठेवतील किंवा कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र करणार नाहीत. पण सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की अध्यक्षांना आज निकाल द्यावाच लागेल. कोणत्यातरी एका गटाच्या आमदारांना अपात्र करावंच लागेल. 

या प्रकरणामध्ये पक्षांतर बंदीच्या शेड्युल्ड 10 चे उल्लंघन कुणाकडून झालं आहे याची चर्चा वारंवार झाली. आता या पक्षांतर बंदीच्या कायद्याचं उल्लंघन हे ठाकरे गटाकडून केलं गेलं असल्याचं या निकालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

ही बातमी वाचा: