ShivSena MLA disqualification : शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shinde Group) एकूण 16 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, आज संध्याकाळी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे, या आमदारांमध्ये मराठवाड्यातील दोन्ही गटाचे एकूण 9 आमदारांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), धाराशिव (Dharashiv), नांदेड (Nanded), परभणी (Parbhani) जिल्ह्यातील हे आमदार आहेत. त्यामुळे हे सर्व आमदार पात्र की अपात्र ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.


शिंदे गटाचे आमदार...


संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) : पैठण विधानसभा मतदारसंघ 
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) : छत्रपती संभाजीनगर पश्चिम
रमेश बोरनारे (Ramesh Bornare) : वैजापूर विधानसभा मतदारसंघ 
तानाजी सावंत (Tanaji Sawant) : भूम-परंडा विधानसभा मतदारसंघ
बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ


ठाकरे गटाचे आमदार...


कैलास पाटील (Kailas Patil) धाराशिव विधानसभा मतदारसंघ
उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) कन्नड विधानसभा मतदारसंघ
राहुल पाटील (Rahul Patil) परभणी विधानसभा मतदारसंघ


तीन मंत्र्यांचा सहभाग...


ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यातील 9 आमदार मराठवाड्यातील आहेत. विशेष म्हणजे यापैकी तीन आमदार सध्याच्या सरकरमध्ये मंत्री आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे सरकारमध्ये रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आहेत. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत. तसेच, भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत. त्यामुळे हे तीनही मंत्री अपात्र ठरणार की पात्र हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे. 


मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी...


मराठवाड्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे एकूण 12 आमदार आहेत. या 12 पैकी 8 आमदार फुटले आहेत. मात्र, एकंदरीत मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका नगरसेवक, आमदार आणि खासदार यांची देखील संख्या अधिक आहे. त्यामुळे, मंत्रीमंडळात देखील शिवसेनेचे मराठवाड्यातील तीन मंत्री आहेत. विशेष म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद देखील अंबादास दानवे यांच्या रूपाने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेच आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत, आम्ही काय दबाव टाकणार? ठाकरे गटाचे आमदार थेटचं बोलले