MLA Disqualification Case Verdict : आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची आमची उत्सुकता संपली असून याचा निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे, निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात लागणार असल्याचा शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या आमदारांनी आम्हाला सांगितल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला. त्यामुळे सत्तेचा कसा दुरूपयोग होतोय याची प्रचीती येतेय, आम्ही याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊच पण जनतेच्या कोर्टातही जाऊ असंही वैभव नाईक यांनी म्हटलंय. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अवघ्या एका तासावर आला असताना वैभव नाईकांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
काही लोकांना आधीच निकाल कळतोय
आमदार वैभव नाईक म्हणाले की, या आधीही पक्ष चिन्हाच्या वेळी शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं होतं की चिन्ह त्यांनाच मिळणार. आताही शिंदे गटाचा एक आणि ठाकरे गटाचा एक आमदार मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागणार आहे. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार आहेत. हा निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे. त्यामुळे आमची उत्सुकता आता संपली आहे.
निकाल आधीच फुटला
आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा आधीच फुटला असल्याचा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला. ते म्हणाले की, सुनील प्रभू यांचा व्हिप आम्ही मान्य केला, सर्वोच्य न्यायालयानेही त्यांचाच व्हिप योग्य ठरवला होता. पण आता त्याच्या विरोधात निर्णय आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मला भेटणाऱ्या दोन आमदारांनीही सांगितलं की निकाल ठाकरेंच्या विरोधात लागला असून तो दोन दिवसांपूर्वीच लागला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून सर्व काही स्पष्ट होत असल्याचं आमदार वैभव नाईक म्हणाले.
राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा
आमदार वैभव नाईकांच्या या दाव्यानंतर कोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही हा निकाल फुटल्याचा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी त्यांनी आहे. देशमुखांच्या या मागणीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय, त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलंय.
ही बातमी वाचा: