एक्स्प्लोर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून शिवसेना-पडळकर आमनेसामने

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे दोनदा अनावरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून शिवसेना आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावरण हे येत्या 16 मार्चला करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनीही 11 मार्चला अनावरण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, या पुतळ्याचे अनावरण रखडले होते, यानंतर एक जानेवारी रोजी धनगर समाज नेते तथा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी भेट देऊन येत्या पंधरा दिवसात जर या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नाही तर आम्ही समस्त मेंढपाळांना घेऊन या पुतळ्याचे अनावरण करू असे जाहीर केले होते. यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांना येता आले नसल्याने हे रखडल्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी आज आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ व पत्रिका पोस्ट केली ज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती 16 मार्चला असून या जयंतीदिनी मी या पुतळ्याचं अनावरण मेंढपाळ बांधव भगिनी यांच्या हस्ते करणार असल्याचे जाहीर केले. त्यावर लगेच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या पुतळ्याचे अनावरण कोरोना असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत 11 मार्च रोजी करणार असल्याचे जाहीर केल्याने आता नेमकं कोण या पुतळ्याचे अनावरण करणार असा प्रश्न निर्माण झालाय.

यापूर्वीही पुतळ्यावरुन वाद जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन गोंधळ झाला होता. खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, 12 मार्चला पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचार्यांमधे झटापट देखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Rana Suryavanshi Baramati Crime: उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; करमाळ्यातील नवनाथ झोळ बारामती पोलिसांच्या ताब्यात, नेमकं कारण काय?
उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; करमाळ्यातील नवनाथ झोळ बारामती पोलिसांच्या ताब्यात, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Embed widget