एक्स्प्लोर

Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live Updates : मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे... महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live : शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय. या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे. या मेळाव्याचे लाईव्ह अपडेट्स....

LIVE

Key Events
Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live Updates : मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे...  महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Background

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live : उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे (Shiv Sena Dasara Melava)  लागले आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde) दसरा मेळावे होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava Speech) यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदाच्या भाषणात उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

>> उद्धव यांच्या भाषणात  या मुद्यांचा समावेश असणार?

> काही महिन्यातच होणाऱ्या  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सरकार असणार आहे. उद्धव यांनी शिवसैनिकांना होऊ दे चर्चा हा कार्यक्रम दिला होता. यातून केंद्र सरकारच्या कारभाराचे आणि निवडणूक आश्वासनांचे वाभाडे काढण्यात आले. आता, उद्धव पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर कोणता हल्लाबोल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय, उद्धव ठाकरे हे विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीबद्दलही उपस्थित शिवसैनिकांना आपली भूमिका अधिक स्पष्ट करून सांगण्याची शक्यता आहे. 

> जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्वाच्या मुद्यावर टीका केली जात आहे. राम मंदिर उद्घाटन आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव हे आपल्या भाषणात भाजपवर, शिंदे गटावर प्रहार करण्याची शक्यता आहे.

> राज्यात कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक विम्याची रक्कम मिळत नसल्याचे आरोप होत आहे. पिक विमा योजनेतील घोटाळा, राज्य सरकारचे असलेले दुर्लक्ष आदी मुद्यांवर उद्धव भाष्य करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

>  राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव भाष्य करू शकतात. उद्धव यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आले नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. त्यालाही उत्तर देत मराठा समाजाला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करू शकतात. 

> शासकीय कार्यकारी पदांसाठी कंत्राटी नोकर भरतीचा आदेश सरकार काढला. विद्यार्थी-युवकांच्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मागे घेणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी फडणवीस यांनी याचे खापर मविआ सरकारवर फोडले. त्यालाही उद्धव उत्तर देण्याची शक्यता आहे.  

> त्याशिवाय परदेश दौरे, भ्रष्टाचार, ड्रग्ज रॅकेट, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर उद्धव तोफ डागण्याची शक्यता आहे. 

20:53 PM (IST)  •  24 Oct 2023

Dasara Melava : पीएम केअर फंडची चौकशी करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलीये.

Dasara Melava :  जर तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर पीएम केअर फंडाची आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीये. 

20:52 PM (IST)  •  24 Oct 2023

Dasara Melava : मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले

Dasara Melava :  मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.  

20:51 PM (IST)  •  24 Oct 2023

Dasara Melava :  उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला

Dasara Melava :  मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी टोला लगावला. 

20:51 PM (IST)  •  24 Oct 2023

Dasara Melava : उद्धव ठाकरेंकडून मनोज जरांगेंच कौतुक

Dasara Melava :  उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले. त्यांनी शांततेत सुरु ठेवलेल्या आंदोलनाचं आणि धनगर समाजाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. 

20:38 PM (IST)  •  24 Oct 2023

Dasara Melava : मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे... महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava Uddhav Thackeray :  मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार...पालकमंत्री केलं एका बिल्डरला... त्याचं ऑफिस मुंबई महापालिकेत... मुंबई बिल्डरांना देण्यासाठीचा प्रयत्न 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget