एक्स्प्लोर
Advertisement
राम मंदिराच्या मुद्द्यावर सेना-भाजपची युती होईल : अजित पवार
शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले तर त्यांना फटका बसेल. म्हणून शेवटच्या क्षणी राम मंदिर सारख्या मुद्द्यावर आमचं एक मत झालं, असं म्हणून युती करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
जळगाव : शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले तर त्यांना फटका बसेल. म्हणून शेवटच्या क्षणी राम मंदिर सारख्या मुद्द्यावर आमचं एक मत झालं, असं म्हणून युती करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ते जळगावमधील परिवर्तन सभेत बोलत होते. अजित पवारांनी या सभेत भाजप शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
आघाडी सरकारच्या काळात अधिकारी बिनधास्तपणे कामं करायचे पण या भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात नेत्यांच्या दबावाखाली अधिकारी काम करतात. उच्च शिक्षित व इंजिनीअर झालेल्या युवकांना पकोडे तर युवतींना चहाची दुकान लावून आपला उदनिर्वाह करण्याची वेळ युती सरकारनी आणली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी सेना-भाजपवर टीका केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट आता ओसरली आहे. जनतेच्या मनात आता सरकार विषयी नाराजी असल्याचं अजित पवार म्हणाले. या सरकारने फक्त आश्वासने दिली, कामं केली नाही, असंही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा आघाडीचा निर्णय 48 पैकी 44 जागांवर दोघांचं एक मत झाल आहे. उर्वरीत चार जागांचा निर्णय चर्चेअंती सोडवणार असल्याचं अजित पवार म्हणाले. प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा विचार सुरु आहे, असंही ते म्हणाले.
समाजातील नावाजलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशाच प्रकारे उज्वल निकम यांचं नाव समोर आलं आहे. निवडणूक लढवण्याबाबतीत उज्ज्वल निकम यांनी अद्याप होकार दिला नसला तरी नकार सुद्धा दिला नाही. उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
क्रीडा
Advertisement