एक्स्प्लोर

सावरकरांना 'भारतरत्न': 'जाहीरनाम्यात उल्लेख का? थेट का नाही देत?', शरद पोंक्षे यांचा भाजपला सवाल

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची घोषणा भाजपनं यंदा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात केली आहे. मात्र, या घोषणेचं स्वागत करतानाच, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाजपला टोलाही लगावलाय. २०१४पासून केंद्रात व राज्यात भाजप सरकार असताना इतरांप्रमाणे सावरकारांनाही थेट 'भारतरत्न' देण्याऐवजी जाहीरनाम्यात घोषणा का करावी लागते, असा सवालच त्यांनी केला आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपलं 'संकल्पपत्र' जाहीर केलंय. यात अनेक घोषणांशिवाय एका घोषणेची मोठीच चर्चा सुरू झालीये. ती म्हणजे- महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याविषयी पाठपुरावा करण्याचं आश्वासन. मात्र, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी निवडणुकीच्या तोंडावर अशी घोषणा करण्याच्या भाजपच्या 'टायमिंग'वर बोट ठेवलंय. २०१४पासून भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात असताना अनेकांना 'भारतरत्न' प्रदान करण्यात आले. त्याचवेळी, सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आले असते. त्यामुळे, आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनाम्यात निवडून आल्यास सावरकरांना 'भारतरत्न' देऊ, असं काही म्हणण्याची गरज नव्हती. असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी (भाजप) अनेकांना दिला तसाच सावरकरांनाही 'भारतरत्न' देता आला असता. "...त्यामुळे हिंदुत्ववादी, सावरकरवादी मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी हे कुठेतरी आहे की काय, अशी शंका येते", अशी खरमरीत टीकाही पोंक्षे यांनी केली. मात्र, तरीही भाजपला सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची बुद्धी झाली, याबद्दल सावरकरप्रेमी म्हणून आभारी आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्या खेपेस केंद्रात व राज्यात सत्ता असूनही भाजपकडून या मागणीची पूर्तता झाली नव्हती. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं या मागणीला स्थान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget