Sharad Pawar Live Address : महाविकास आघाडी सरकार पुन्हा येणार : शरद पवार
Sharad Pawar Pm Modi Meet Live Update : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांची भेट, संसदेतील पंतप्रधान कार्यालयात 20 ते 25 मिनिटे चर्चा, महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण
Sharad Pawar on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार आहे. महाविकास आघाडी सरकारला सध्या कोणताही धोका नाही
Sharad Pawar on Nawab Malik : महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही. फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे. नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही
Sharar Pawar on Mungantiwar : राष्ट्रवादी आणि शिवसोना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधी भाजप सोबत नव्हती. दुसऱ्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे.
Sharad Pawar Live Speech : 12 आमदारांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. त्यावर विचार करून शरद पवार निर्णय घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.
Sharad Pawar Live Speech : महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही. फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे.
Sharad Pawar Live Speech : लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेला उपस्थित आहे.
Sharad Pawar Live : शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू, पवार आणि मोदी यांच्या भेटीवर शरद पवार काय बोलणार? याकडे सगळ्याचे लक्ष आहे
Sharad Pawar : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यामागील कारण स्वत: शरद पवार सांगणार आहेत. शरद पवार आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
Sharad Pawar Pm Modi Meet : 'संसदेच्या कामकाजासाठी दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट झाली असू शकते'; शरद पवार- नरेंद्र मोदी भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. दिल्लीत शरद पवार आणि नरेंद्र मोदींमधील भेटीनं भुवया उंचावल्या
Sharad Pawar Pm Modi Meet : पवार डॅमेज कंट्रोल करण्यात तरबेज आहेत, असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
Sharad Pawar Pm Modi Meet : 'आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही'; मोदी-पवार भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं सूचक वक्तव्य. वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा.
Sharad Pawar Pm Modi Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
Maharashtra News : राज्यात ईडीच्या कारवाया सुुरु आहेत. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालीय. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. याआधी 17 जुलै 2021 रोजी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यातच आता महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पार्श्वभूमी
Sharad Pawar Meets PM Modi : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन
मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत आमदारांच्या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेले राज्यातील आमदारांसह खासदारही उपस्थित होते. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -