एक्स्प्लोर

शरद पवारच सहकार चळवळीचे आधारस्तंभ : आनंदराव अडसूळ

"सहकारी बँकाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली काम करतो करतो म्हणतात, पण प्रत्यक्षात होत नाही. "

मुंबई : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केली आहे. तसेच, सहकार चळवळीसाठी पवारांसारख्या नेत्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. आर्थिक अडचणीत आलेल्या सिटी बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केंद्र सरकारच्या सहकार धोरणावर नाराजी व्यक्त केली. सहकारी बँकाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली काम करतो करतो म्हणतात, पण प्रत्यक्षात होत नाही. आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं वाटते, आता तर आम्ही निवडणूक विरोधात लढवायचे ठरविले आहे, असे खासदार अडसूळ यांनी यावेळी सांगितले. शरद पवार काय म्हणाले? “आता दिवस थोडे वेगळे आहेत. सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होताना दिसतो आहे. चार-पाच लोकांची चूक होते, पण त्याची किंमत सर्व लोकांना भोगावी लागते. अशा परिस्थितीत सरकारने मात्र पाठीशी राहिले पाहिजे.”, असे शरद पवारांनी सहकारी बँकांबाबत बोलताना म्हटले. “बॅंक अडचणीत आली की सहकार्य करण्याऐवजी बंधने घातली जातात. काहीतरी गडबड आहे, असं ग्राहकांना वाटतं आणि त्यामुळे आणखी अडचणी वाढतात. संकटातून बाहेर काढण्याच काम राहते आणि समस्याच वाढत जातात.”, असेही पवार म्हणाले. “पेशंट अडचणीत आहे, त्यावेळेस औषध दिले जात नाही. सहकारी बँकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा योग्य नाही. जो बलवान आहे, त्या मोठ्या बँकांना मदत केली जाते. पण सामान्य माणसाला मदत करणाऱ्या सरकारी बँकांकडे मात्र लक्ष दिले जात नाही. सामान्य माणसाला मदत करण्याचे काम सहकार क्षेत्र करते. सहकारी चळवळ टिकवण्याचे काम केले पाहिजे. राजकारण न आणता मदत केली पाहिजे.”, अशा भावना शरद पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या. “नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला, आता नोटा बदलून देत नाहीत. काय करणार आता बँका आणि चेअरमन? यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, नोटा बाद करु नका असे आदेश आता दिले. ज्या बँकांना मदत करायची त्यांना केली जात नाही आणि ज्या बलदंड बँका त्यांना हजारो कोटी मदत केली जाते हे अवघड आहे.”, असे शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget