एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : दीड तासांनी अवघी 15 मिनिटे भेट अन् छगन भुजबळांनी विषय काढताच शरद पवारांचा पहिला प्रतिप्रश्न! भुजबळांनी काय उत्तर दिलं?

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी मुद्द्यांवरून नाराज असल्याची चर्चा असताना भुजबळ आणि पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आले. 

मुंबई : बारामतीमध्ये अवघ्या काही तासांपूर्वी केलेल्या जनसन्मान रॅलीमधील घणाघाती टिकेनंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (15 जुलै) थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी मुद्द्यांवरून नाराज असल्याची चर्चा असताना भुजबळ आणि पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आले. 

आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. मात्र तब्बल दीड तासानंतर या दोन नेत्यांमध्ये 15 मिनिटे भेट झाली. अवघ्या पंधरा मिनिटांच्या भेटीत काय घडलं? याची माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत दिली. भुजबळ म्हणाले की, ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका. ओबीसी मुद्यावर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा केल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचं काम पवारांनी केलं. आता आरक्षणावर राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. त्या संदर्भात मी त्यांना आठवण करून दिली आणि त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यावेळी जो पुढाकार घेतला होता या संदर्भाने सुद्धा त्यांना आठवण करून दिली.

शरद पवारांकडून भुजबळांना प्रतिप्रश्न 

भुजबळ यांनी ही माहिती देत असतानाच त्यांचं म्हणणं असं होतं की जरांगेंसोबत काय चर्चा केली माहिती नसल्याचा असा प्रति प्रश्न शरद पवार यांनी केला. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह ससाणे आणि वाघमारे यांचे उपोषण सोडायला गेल्यानंतर काय चर्चा झाली हे देखील मला माहित नसल्याचे शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले. यानंतर छगन भुजबळ यांनी उपोषणकर्त्यांना सरकारकडून काय माहिती देण्यात आली याबाबत पवारांना माहिती दिली. पवारांच्या प्रतिप्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी सांगितले की त्यावेळी आम्ही आंदोलकांना आश्वासन दिले की सरकारी योग्य पद्धतीने यावरती मार्ग शोधेल. मी त्यांना विनंती केली की तुम्ही राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. 

पवार म्हणाले मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो

50 लोकमंधे कशी काय चर्चा होऊ शकते? तेव्हा पवार म्हणाले मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो आणि त्यानंतर हा विषय कसा सोडवायचा याबाबत मार्ग काढतो. ओबीसी विषय सुटावा हाच आमचा विषय आहे. मी या विषयाबाबत कुणालाही भेटायला तयार आहे. गोरगरीबांची घरं पेटता कामा नये म्हणून पंतप्रधान असो की राहुल गांधी कुणालाही भेटायला तयार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगनाव आढावा एका क्लिकवर ABP MajhaPune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP MajhaMaharashtra Monsoon Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर : 15 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
Embed widget