एक्स्प्लोर
शरद पवार माढ्यातून फायनल, बैठकीत शिक्कामोर्तब
राष्ट्रवादीच्या माढा आणि अन्य मतदारसंघाबाबत रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे अंतिम झाल्याने मतदारसंघातील मतभेद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार असून ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादीच्या माढा आणि अन्य मतदारसंघाबाबत रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत माढ्यातून शरद पवार स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे अंतिम झाल्याने मतदारसंघातील मतभेद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाराज नेते आणि समर्थक यांच्यात समेट घडवून एकदिलाने निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला निंबाळकर यांच्यासह विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख, माजी आमदार दीपक साळुंके, रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी होती. तर शेकापकडून माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुखही उपस्थित होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी नाराज नाही. मी स्वत: शरद पवार यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली असेही ते म्हणाले.
उद्या पवार मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेणार
दरम्यान, पवारसाहेबांनी माढा लोकसभा लढवावी याबाबत आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे मागणी करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. अजून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मित्रपक्ष एकत्र यावेत असे आम्हाला वाटत आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी, याबाबत चर्चा सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले. लोकसभेची वेगवेगळ्या मतदारसंघात आखणी करत आहोत. उद्या पवार साहेब मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. शेवटी आघाडीच्या एकत्रितच जागा जाहीर केल्या जातील.वेगवेगळया जाहीर होणार नाहीत असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले. लोकसभा संपत आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल,शिवाय लोकसभेचे कॅपेन कसे करायचे यावर चर्चा होणार आहे अशी माहितीही पाटील यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
