एक्स्प्लोर

नीरव मोदीचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातलाच : शरद पवार

आगामी राजस्थान , कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभा निवडणूक शेवटच्या दिवशीपर्यंत लांबतील, असे पवार यांनी सांगितले.

पंढरपूर : नीरव मोदी याचा घोटाळा मोदी सरकारच्या काळातील असून, त्याची सखोल चौकशीची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. या नीरव मोदीबाबत मनमोहन सिंग सरकारवर आरोप केले जात असले, तरी नीरव मोदीने 2011 मध्ये फक्त खाते उघडले होते, बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचे पवार यांनी म्हटले. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत 2016 मध्ये कळवून देखील त्याची दखल न घेतल्याने हा नीरव मोदी देशाला फसवून पळून गेल्याचे सांगत, हा सर्व वर्ग भाजपला पाठिंबा देणारा असल्याचा आरोप पवार यांनी केला. या सर्व प्रकारच्या चौकशीची गरज पवार यांनी व्यक्त केली. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी पवार आले होते. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रहार करताना पवार म्हणाले, “आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संघ स्वयंसेवकांना लाठ्या घेऊन काश्मीर सीमेवर पाठवावे म्हणजे भागवतांच्या बोलण्यात किती तथ्य आहे, ते देशाला कळेल.” काश्मीर सीमेवर अतिरेक्यांशी लढताना रोज सैनिक शहीद होत असताना, सैन्यदलाच्या बाबतीत असे  कुप्रतिष्ठा करणारे विधान करणे योग्य नसल्याचे पवार यांनी सांगितले. भिडे-एकबोटे यांच्याबाबत बोलताना सध्याचे सत्ताधीश त्यांच्या पाय पडत असल्याने त्यांच्यावर कारवाई होईल, असे वाटत नसल्याचा टोला पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. “राज्यातील जनतेचा आता या सरकारवर विश्वासच राहिला नसल्याने निराश लोक आता मंत्रालयात येऊन आत्महत्या करु लागले आहेत. आपली कामे हे सरकार करीत नसल्याची भावना झाल्यानेच मंत्रालयात आत्महत्यांचे सत्र सुरु झाले असून यातून आतातरी सरकारने धडा शिकवा.”, असे पवारांनी म्हटले. आगामी राजस्थान , कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यातील निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागल्यास लोकसभा निवडणूक शेवटच्या दिवशीपर्यंत लांबतील, असे पवार यांनी सांगितले. शिवाय, सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन समर्थ पर्याय निर्माण करु लागल्याचे पवार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget