K Chandrasekhar Rao : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. "तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. तेलंगणाची जनता संपूर्ण आयुष्यभर शरद पवार यांचे उपकार विसरणार नाही, अशा भावना के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केल्या.
भाजपविरोधात देशभरात आघाडी निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेते प्रकाश राज, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
चंद्रशेखर राव म्हणाले, शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. देशातील सध्याच्या राजकारणावर आमच्यात चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बारामतीत आम्ही एक बैठक घेऊ. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन देशात परिवर्तनासाठी प्रयत्न करू. ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे, त्या पद्धने सध्या विकास होत नाही. त्यामुळे देशात परीवर्तन झालेच पाहिजे."
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात काम करायचंय
दरम्यान, पुढे बोलताना चंद्रशेखर राव म्हणाले, "शरद पवार यांनी आज मला आर्शीवाद दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात काम करायचे आहे. समविचारी पक्षांसोबत चर्चा करून आमची भूमिका लवकरच देशासमोर ठेवू अशी माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ ; वर्षा बंगल्यावरून के. चंद्रशेखर राव यांचा भाजपवर निशाणा
- पंतप्रधान मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. चंद्रशेखर राव
- Punjab Election: जोपर्यंत बाबा जिंकत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही... नवज्योत सिंह सिद्धूच्या मुलीने घेतली शपथ
- Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण