बारामती :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Sharad Pawar)  पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे.  दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्यावतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात. यंदाच्या  दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून  पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडली आहे.   शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. 


राजकीय दिवाळीचा विषय निघाला की महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरची दिवाळी. बारामतीमधील गोविंदबागेतील दिवाळी सर्वांनाच आठवते. दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करतं. यंदा पवार कुटुंबात  फूट पडली आहे.  पक्षात फूट पुडल्यानंतर  अजित पवार गट वेगळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबातील व्यक्तींचे विभाजन झाले आहे. आता तर विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. त्यामुळे पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय आहे. दिवाळी निमित्त पवार कुटुंब आणि बारामतीकरांच्या भेटीगाठी ही प्रथा आता पंरपरा झाली आहे.


अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत


पाडव्याची परंपरा  गेल्या काही वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. सत्ता असो वा नसो, पण शरद पवार आणि कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे, त्यांची भेट घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे हा सिलसिला कित्येक वर्षांपासून सुरु आहे. यंदा कार्यकर्त्यांची गर्दी होते.यंदा पवार कुटुंबाचे दोन पाडवे बारामतीत होणार आहे.  याआधी शरद पवार फक्त गोविंद बागेमध्ये पाडवा घ्यायचे परंतु अजित पवार उद्या काटेवाडीमध्ये पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत. शरद पवारांचा दिवाळी पाडवा हा गोविंद बागेत होईल तर अजित पवारांचा पाडवा हा काटेवाडी येथे होणार आहे. बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केले आहे. 


गोविंद बागेत प्रचंड गर्दी


दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग हे अतिशय वेगळं समीकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाडव्या अगोदरच आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी  प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.  




हे ही वाचा :


राजकारणाच्या पंढरीत दिवाळसण जोमात, शरद पवारांच्या गोविंदबागेत तुफान गर्दी; फराळाच्या मेजवाणीत प्रचाराची खलबतं!