राजकारणाच्या पंढरीत दिवाळसण जोमात, शरद पवारांच्या गोविंदबागेत तुफान गर्दी; फराळाच्या मेजवाणीत प्रचाराची खलबतं!
शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपवार प्रेमी राज्यभरातून बारामतीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी तसंच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात.
परंतु आजच कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केल्याचं पाहायला मिळते.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून पुन्हा एकदा शरद पवारांचा (Sharad Pawar) करिश्मा महाराष्ट्राने पाहिला आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे.
बारामतीमध्ये साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली आहे .त्यासाठी बारामतीत आलो , अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे.
दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.