एक्स्प्लोर

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा, गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश  

Shambhuraj Desai : मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी

Shambhuraj Desai : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे  महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu on Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी 'देवाभाऊ' अन् एकनाथ शिंदेंचे आभार; पण..; बच्चू कडू आंदोलनावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
शेतकरी कर्जमाफीसाठी 'देवाभाऊ' अन् एकनाथ शिंदेंचे आभार; पण..; बच्चू कडू आंदोलनावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
Shaktipeeth Highway: ...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही; शेतकऱ्यांच्या थेट इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात विराट मोर्चा
...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही; शेतकऱ्यांच्या थेट इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात विराट मोर्चा

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Embed widget