एक्स्प्लोर
प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप, संतप्त विद्यार्थिनींकडून बेदम चोप
बीड : प्राध्यापकानेच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयातील राणा डोईफोडे असं या प्राध्यापकाचं नाव आहे.
डोईफोडेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप 4 विद्यार्थिंनींनी केला आहे. काल राणा डोईफोडेभोवती विद्यार्थिंनींनी घेराव घातला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी डोईफोडेला ताब्यात घेतल्यानंतरही संतप्त विद्यार्थिनींनी पोलिसांची गाडी अडवून डोईफोडेला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बेदम मारहाण केली. डोईफोडेवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement