एक्स्प्लोर
Advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांना 4 ते 14 हजार रुपये वेतनवाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के पगारवाढ दिली जाणार आहे.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के पगारवाढ दिली जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे निश्चित झाले आहे. हा निर्णय घेतल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना चार हजार ते 14 हजार रुपयांची पगारवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्य़ात येत आहे.
राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्याद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते 14 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे परंतु 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. तसेच 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 42 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.
संबधित बातम्या : कसा लागू होणार सातवा वेतन आयोग?
तुमच्या खिशातील पैशातून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement