चंद्रपूर वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त आंदोलक सलग चौथ्या दिवशी 460 फूट उंच चिमणीवर
चंद्रपूर येथील प्रकल्पग्रस्त आणि आंदोलक यांच्यातील चर्चा अनिर्णित राहिल्याने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर सुरू असलेले आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच आहे.
चंद्रपूर : वीज केंद्र प्रकल्पग्रस्त आंदोलक सलग चौथ्या दिवशी चिमणीवर बसून आहेत. काल (शुक्रवार) नागपूर येथे झालेल्या बैठकीत आधी आंदोलकांनी टॉवर खाली उतरावे नंतरच पुढील चर्चा करू, अशी सरकारने अट टाकली. पण प्रकल्पग्रस्तांनी आधी निर्णय घ्या मग उतरू अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिकेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत संतापले आणि मीटिंग सोडून निघून गेले. बैठक न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे 5 प्रतिनिधी काल रात्री चंद्रपूरला परतले.
या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली CISF सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे नातेवाईक आज रस्तावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सुमारे 140 मीटर उंचीवर बुधवार सकाळी साडेआट वाजतापासून आंदोलन करत आहेत. यात 5 पुरुष आणि 2 महिला प्रकल्पग्रस्तांचा समावेश आहे. (चिमणीची एकूण उंची 275 मीटर आहे)
बोगस सोयाबीनप्रकरणी राज्य सरकार 'ॲक्शन मोड'वर, अकोल्यात 'महाबीज'सह पाच कंपन्यांवर खटले
काय आहे प्रकरण? चंद्रपूर येथील CISF ची सुरक्षा भेदून महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर 8 प्रकल्पग्रस्त चढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं हे प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी देण्याचा करार वीज कंपनीने केला होता. मात्र, अनेक वर्षे उलटूनही नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांनी ही विरुगिरी केली. हा संपूर्ण परिसर सीआयएसएफच्या संरक्षणात आहे. तरीही हे आंदोलक चिमणीवर चढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
Chandrapur Tigers | वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला, वनमंत्री संजय राठोड यांच्याशी खास बातचीत