एक्स्प्लोर

वीज अंगावर पडून राज्यभरात 7 जणांचा मृत्यू

वीज अंगावर पडून राज्यात अमरावती आणि अकोला जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : अमरावती आणि अकोला जिल्ह्यात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला असून तर सहाजण जखमी झाले आहेत. यात शेतमजूर आणि प्रवाशांचा समावेश आहे. मृतांमध्ये 12 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आज संध्याकाळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहे. त्यावेळी या घटना घडल्या. अमरावतीत वीज पडून तिघांचा मृत्यू अमरावती ते अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे.  बोपापूर येथील सोनाली गजानन बोबडे (वय 35), अचलपूरच्या विलायतपुरा येथील शोभा संजय गाठे (वय 45) आणि अंजनगाव सुर्जी येथील सैय्यद निजामोद्दीन सैय्यद बदरोद्दीन (वय 65) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात गडगडटात तसेच विजांसह अचानक पावसास सुरुवात झाली. अचानक पाऊस सुरु झाल्याने दुचाकीने अचलपूरकडे जाणाऱ्या काही प्रवाशांनी आसेगाव पूर्णा परिसरात झाडांचा आसरा घेतला. अशातच झाडावर अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन महिला आणि एक पुरूष असा तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले आहे. वीज पडल्याची माहिती मिळताच जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिघांना मृत घोषित करण्यात आले. अकोल्यात चार जणांचा म्रूत्यू अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील वरुड बुझरुक गावात आज दुपारी वीज पडून चार शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे. म्रूतांमध्ये गजानन अढाऊ, गणेश मोकळकार आणि लक्ष्मी अढाऊ या महिलेचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. अकोट तालूक्यातील बेलूरा येथे दादाराव पळसपगार या शेतमजूराचा म्रूत्यू झाला आहे. यात एकजण जखमी झालाय.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
Embed widget