Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Sharad Pawar : ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज पुन्हा(शुक्रवारी) शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबई: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ओबीसीचे समन्वयक ईश्वर बाळबुद्धे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. बाळबुध्दे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित आहेत. बाळबुध्दे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसांपूर्वीच राम-राम केला होता. आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले ईश्वर बाळबुध्दे?
यावेळी बोलताना ईश्वर बाळबुध्दे म्हणाले, 'मी छगन भुजबळ साहेबांबरोबर गेली ३० वर्ष काम करतोय. पण मंडल आयोगाची आणि ओबीसी घटकाला खरा न्याय दिला ते शरद पवार आहेत आणि आता जर या वर्गाला ओबीसी घटकाला न्याय देण्यासाठी उभे करण्यासाठी कोणी प्रयत्न करतेय ते जयंत पाटील साहेब आहेत. आज थोडे वाईट वाटते की, ३० वर्ष छगन भुजबळ साहेबांसोबत होतो. मी आज त्यांना सांगितले त्यांना हात जोडून आलो की युती ओबीसीला न्याय देऊ शकत नाही, असंही त्यांना सांगितलं असल्याचं बाळबुध्देंनी सांगितलं आहे.
ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज पुन्हा(शुक्रवारी) शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील ओबीसी नेते ईश्वर बाळबुध्दे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत पक्ष कार्यालयात ईश्वर बाळबुध्दे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकसंघ असताना ईश्वर बाळबुध्दे तब्बल सहा वर्ष पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. अजित दादांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ईश्वर बाळबुध्दे अजितदादांसोबत गेले होते. अजितदादांकडे असताना ईश्वर बाळबुध्दे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा प्रदेश संयोजक पद होते. ईश्वर बाळबुध्दे मुळात छगन भुजबळ यांचे खास कार्यकर्ते असून भुजबळांसोबत ते गेले दोन दशक समता परिषदेत सक्रिय आहेत.
वर्षभराच्या आत घरवापसी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली असताना ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. ईश्वर बाळबुद्धे यांनी राज्यभरात यात्रा काढली होती. मागील विधानसभा निवडणुकीत ओबीसी आमदारांचा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा मोठा वाटा होता. ईश्वर बाळबुद्धे प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचार केला होता. ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघालेला नव्हता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता वर्षभराच्या आत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.