(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Serum Institute Building Fire LIVE : कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pune Serum Institute Building Fire LIVE Updates: देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली होती.
LIVE
Background
पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली होती. दरम्यान कोविड-19 या आजारावरील कोविशील्ड या प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथे मे महिन्यापासून सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरिया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.