एक्स्प्लोर
शाळेच्या ड्रेससाठी आठवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
नागपूर : गरीब आई-वडील शाळेचा ड्रेस देऊ शकत नाही, म्हणून नागपुरात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रितू ढाकूळकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.
रितू ढाकूळकर ही रवीनगर परिसरातील सीपी अँड बेरार शाळेत शिकत होती. मागील 3-4 दिवसांपासून ती आई-वडिलांकडे शाळेच्या नवी ड्रेसची मागणी करत होती. मात्र पानट्टी चालवणारे वडील आणि धुणी-भांडी करणाई आई तिला ताबडतोब शाळेचा ड्रेस घेऊन देण्याच्या स्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी रितूला काही दिवस जुना ड्रेस घालूनच शाळेत जाण्याची सूचना केली.
परंतु 12 जुलैला संध्याकाळी रितू शाळेतून घरी परतली आणि आतल्या खोलीत जाऊन गळफास घेतला. तिची आई रात्री उशिरा कामावरुन परतली, त्यावेळी तिला रितू गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला होता.
रितूने सुसाईड नोट लिहिलेली नाही, त्यामुळे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. पण घरात मागील काही दिवसात शाळेच्या नव्या ड्रेससाठी हट्ट सुरु होता. त्याच्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने स्वतःला संपवल्याचं अंदाज पालकांनी वर्तवला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement