एक्स्प्लोर
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
एसटी महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता यावं, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
महामंडळाच्या सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे.
सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल.
दरवर्षी कामगार अधिकारी शिष्यवृत्ती पात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करुन लाभार्थी पाल्यांच्या बँक खात्यावर दरमहा सदर रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
बारावीनंतर केवळ पैशा अभावी एस.टी कमर्चाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींचे उच्चशिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना मांडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement