एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
व्हॉट्सअॅपच्या 4 ओळीनं वाचवला, चार जणांचा जीव!

अकोला: टाईमपासचं साधन म्हणून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाला हिणवलं जातं. मात्र, याच व्हॉट्सअपनं चार जणांचे जीव वाचवले आहेत.
रेखा जोंधळे बुलडाण्यातल्या रहिवासी. रेखाला व्हॉट्सअॅप म्हणजे काय माहित नाही. पण त्याच व्हॉट्सअॅपने तिला जगवलं. 14 तारखेला अकोल्यातल्या जिल्हा रुग्णालयात रेखाला प्रसवकळा सुरु झाल्या. ऑपरेशन सुरु झालं. पण गर्भाशयातच बाळ दगावलं. रेखाची प्रकृतीही चिंताजनक झाली. ऑपरेशनसाठी रक्ताची गरज होती. पण ग्रुप होता ए निगेटिव्ह. जो अत्यंत दुर्मिळ मानला जातो.
रक्तपेढीही हतबल झाली. पण तितक्यात एक चमत्कार झाला. रक्तपेढीच्या प्रमुखांनी एक व्हॉट्सअॅप मेसेज वरिष्ठांना केला
एका ग्रुपवरून दुसऱ्यावर दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असा फिरत त्या मेसेजनं दुर्मिळ असलेल्या रक्तगटाच्या 8 जणांपर्यंत धाव घेतली. आठ ग्रुपवर तो मेसेज पाठवल्यानंतर काही तासात हे रक्तदाते मिळाले. त्यातून चार जीव वाचले. त्या चार ओळींच्या एका मेसेजनं चार जीव बचावले.
टाईमपासचं साधन म्हणून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाला हिणवलं जातं. पण योग्य कारणासाठी वापरलं, तर हा मीडिया एखाद्याचं आयुष्यही वाचवू शकतो.
VIDEO:
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement



















