एक्स्प्लोर

Satej Patil on Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभेला डाव आखत पत्ते पिसले, एक्का महाविकास आघाडीकडेच; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य!

Satej Patil on Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभेला डाव सुद्धा आखला आहे. डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल. महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचाही दावाही सतेज पाटील यांनी केला.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Loksabha) जागा कोणाकडे जाणार? हा महाविकास आघाडीमधील सस्पेन्स कायम असताना कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil on Kolhapur Loksabha) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात बोलताना कोल्हापूर लोकसभेबाबत महविकास आघाडीचे पत्ते पिसले असल्याचे म्हणाले. 

शासकीय योजनांसाठी जमा केलेला डाटा विशिष्ट पक्षाकडे कसा? 

सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर लोकसभेला डाव सुद्धा आखला आहे. डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल. महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचाही दावाही सतेज पाटील यांनी केला. दरम्यान, शासकीय योजनांसाठी जमा केलेला डाटा खासगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा? असा गंभीर आरोप पाटील यांनी भाजपवर केला. 

त्यांनी सांगितले की, संबधित पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटाचा वापर केला जात आहे. मी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पीएम किसान,उज्वला गॅस अशा योजनांच्या माहितीसाठी खासगी कॉल सेंटर मधून नागरिकांना फोन येत असल्याचा दावा पाटील यांनी केला.  

तर यापेक्षा वाईट गोष्ट नाही

दुसरीकडे, शिंदे गटात झालेल्या धक्काबुक्कीवर सतेज पाटील यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी हाणामारीच्या घटना घडलेल्या नाहीत. सत्ताधारी आमदारांमध्ये हाणामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही हे वाईट असल्याचे ते म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नसल्याचे ते म्हणाले. उद्या चुकीची घटना घडली तर त्याचे सीसीटीव्ही मिळणार का? अशी विचारणा त्यांनी केली. 

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अमानुष मारहाणीवर ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत.  कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे. संरक्षण असल्याचा समज हा लोकशाहीला घातक आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. 

कोल्हापूरची जागा आम्ही शाहू महाराजांसाठी ठेवली! 

दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Shahu Maharaj) यांनी दिले आहेत. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आत्ताच मी सांगणार नाही, असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?
तब्बल 52 मंदिरांमध्ये स्मार्टफोन बॅन; सेल्फी आणि रीलवर सुद्धा बंदी, VIP ना सुद्धा नियम लागू; कोणत्या राज्याने तगडा निर्णय घेतला?
Iran War Live Update: अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
अमेरिकेने इराणमध्ये पुन्हा एकदा मर्यादा सोडल्या; थेट लग्नावर मिसाईल लागली, 5 ठार, 68 जखमी, तीन दिवसांतील इराणवरील दुसरा हल्ला
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
Embed widget