एक्स्प्लोर
मांढरदेवी गडावर कुटुंबप्रमुखानेच सहा जणांना विष पाजलं
साताऱ्यातील मांढरदेवी गडावर कुटुंबप्रमुखाने स्वतःच्याच कुटुंबीयांना विष पाजल्याचा प्रकार समोर आला आहे.

सातारा : साताऱ्यातील मांढरदेवी गडावर अख्ख्या कुटुंबाने विषप्राशन केल्याच्या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. आरोपीने स्वतःच्याच कुटुंबीयांना विष पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. आपल्या कुटुंबावर करणी झाल्याचं आरोपी विष्णू चव्हाणने अख्ख्या कुटुंबाला सांगितलं. करणी उतरवायची असल्यास साताऱ्यातील मांढरदेवी गडावर जाऊन अमृत प्यावं लागेल, अशी बतावणी त्याने केली.
मांढरदेवी गडावर कुटुंबातील सहा जणांचं विषप्राशन, तरुणाचा मृत्यू
कथित अमृताच्या नावाखाली विष आरोपीने आई, पत्नी आणि मुलांना पाजलं. विष्णू चव्हाणने हे कृत्य का केलं, याचं कारण अद्याप उलगडलेलं नाही. सुरुवातीला चव्हाण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेत स्वप्निल चव्हाण या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, सुनिता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण सुदैवाने बचावल्या आहेत. विषप्राशन केलेल्या तिघांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर दोघांवर वाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















