Vilaskaka Patil Undalkar | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन झालं. महिनाभरापासून त्यांच्यावर साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार सुरु होते. आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन झालं. साताऱ्यात वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील एक महिन्यापासून साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत होते. आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात झालं. तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सगळ्यांच माहित होतं. पंरतु दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं समोर आलं होतं.
विलासकाका पाटील-उंडाळकर यांची राजकीय कारकीर्द
जिल्हा परिषद सदस्य : 1967 ते 1972 शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य सातारा जिल्हा मध्यवती बँक (1967 ते आजअखेर संचालक) अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरा कराड दक्षिण मतदारसंघाचे 1980 ते 2014 पर्यंत सलग 35 वर्षे आमदार दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991 ते 1993 विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003 सहकार व वस्त्रोद्योगमंत्री 2003 ते 2004 महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा 2008
उंडाळकर यांचे उपक्रम - 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन - समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन - देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती - जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती - राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल - डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
निवडणुका जिल्हा परिषद 1967 ते 1972 सातारा जिल्हा बँक 1968 ते आजअखेर लोकसभा 1979 - तालुक्यातून ३३ हजारांची आघाडी विधानसभा 1980-85 : 21 हजार मतांनी विजयी विधानसभा 1985-90 : 14 हजार मतांनी विजयी विधानसभा 1990-95 : 32 हजार मतांनी विजयी विधानसभा 1995-99 : 21 हजार मतांनी विजयी विधानसभा 1999-2004 : 23 हजार मतांनी विजयी विधानसभा 2004-2009 : 1 लाख मतांनी विजयी विधानसभा 2009-2014 : 15 हजार मतांनी विजयी
विकसित केलेल्या संस्था : 1. कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कराड 2. कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लिमिटेड 3. शेती उत्पन्न बाजार समिती, कराड
स्थापन केलेल्या संस्था 1. ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे 2. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, उंडाळे 3. कोयना सहकारी बँक लिमिटेड, कराड 4. रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शेवाळेवाडी
परिषदा : 1. धर्मांध परिषद, मौजे तांबवे, ता. कराड. 2. शैक्षणिक चिंतन परिषद, कराड. 3. विज्ञान परिषद, कराड. 4. डोंगरी परिषद, काळगाव, ता. पाटण. 5. घटना बचाव परिषद, कराड.