Satara News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज सातारा तालूक्यातील वाढे गावातील एक कोटी रूपयांच्या  विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांचे 80 फुटाचा हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी नाव न घेता विरोधकांसह राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. नावासाठी छोटी माणसं शरद पवार यांच्यावर टीका करतात, असा टोला अजित पवार यांनी लगावला. 


अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रात काय प्रश्न आहेत हे महाविकास आघाडीने कामातून दाखवून दिले आहे. काही लोक जातीय तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांच्या नादाला लागू नका. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे हे उगवतात.  भोंगे या आगोदर दिसले नाहित का? जागरण गोंधळ आणि भजन किर्तन उशिरा असते. काकड आरती बंद झाली. कायदा सर्वांना सारखा आहे. नावासाठी छोटी माणसं शरद पवार यांच्यावर टीका करत असतात.  
 
"किसनवीर साखर कारखाना ताब्यात आला त्याबद्दल मतदारांचे आभार माणतो. कारखाना चालवणे येड्या गबाळ्याचे काम नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.  


दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी विनोदबाजी करत आमदार मकरंद पाटील यांच्यावर  मिश्किल शब्दात टिप्पणी केली. " 12 कारखाने चालवायचे आहेत, भाषण करणे सोपं आहे, आमदार मकरंद पाटील यांना आवाहन आहे. नाही चालवला तर आमदारकीला अडचण आहे. डोक्यावर केस राहणार नाहीत. माझ्या सारखे केस होतील, अशी शेरेबाजी अजित पवार यांनी यावेळी केली.   
 
अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील वातावरण बिघडले तर मोठे गुंतवणूकदार आणि उद्योगपती दुसऱ्या राज्यात जातील,त्यामुळे राज्याचे नुकसान होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावाबद्दल कोण बोलत नाही. परंतु, इतर गोष्टींवर बोलून राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम केलं जात आहे." 


महत्वाच्या बातम्या


Sharad pawar : शरद पवारांकडून गौतम अदानींचे कौतुक, म्हणाले...


Sharad Pawar News : शरद पवार म्हणतात, लक्षातच येत नाही गिरीष बापट कुठेही उभे राहतात अन् निवडून येतात