एक्स्प्लोर

कार्यकर्त्याचा आग्रह उदयराजेंकडून पूर्ण, बाईकवरुन धूम स्टाईल फेरफटका!

आपल्या डायलॉग आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले कार्यकर्त्यांचा आग्रह सहसा नाकारत नाहीत. सातारकरांना याची प्रचिती काल सुद्धा आली. कार्यकर्त्याने त्याची नवीकोरी बाईक चालवण्याचा आग्रह उदयराजेंना केला. यानंतर उदयनराजेंनीही बाईकवरुन फेरफटका मारला.

सातारा : खासदार उदयनराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. राजघराण्यातील उदयनराजेंची जशी क्रेझ आहे, तसंच काहीसं उदयनराजेंनी बाईक रायडिंगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसं गुरुवारी (22 ऑक्टोबर) घडले.

उदयनराजे दुपारी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवत होते. त्यावेळी प्रतिक कांबळे नावाचा एक कार्यकर्ता जलमंदिरात त्याची स्वत:ची कावासकी 800 ही गाडी घेऊन जलमंदिरात घेऊन आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. उदयनराजे तसे थोडे खुशच होते. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिरापासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड मारले. पण हे राऊंड काही साधे नव्हते. राजे खुश असल्यामुळे त्यांच्या गाडीने केव्हा शंभरच्या पुढ वेग गाठला समजलेच नाही. परंतु गाडीचा राऊंड मारताना मात्र त्यांच्या स्पीडने जलमंदिरातील उपस्थितांच्या छातीचा ठोका चुकला.

तसं तर राजकारणातल्या कोणत्याही पक्षात ते गेले की त्यांचा स्पीड असाच काहीसा असतो. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाडीच्या राऊंडमधून त्यांनी 'अभी तो मैं जवान हूं' असाच काहीसा संदेश सर्वांना दिला यात शंका नाही.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget