एक्स्प्लोर

खासदार उदयनराजेंचं भीक मांगो आंदोलन, म्हणाले, मला भीक मागायची वेळ आलीय तर... 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाक्यावर झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे हाल होत आहेत, अनेकांच्या पोटाला अन्न नाही असे म्हणत उदयनराजेंनी हे आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावाधाव झाली.

सातारा :  वीकेंड लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाक्यावर झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे हाल होत आहेत, अनेकांच्या पोटाला अन्न नाही असे म्हणत उदयनराजेंनी हे आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावाधाव झाली. उदयनराजे यावेळी बसायला पोती आणि ताट घेऊन आले होते. या भीक मांगो आंदोलनात जमा झालेले पैसे त्यांनी जिल्हाधिकारी यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच अडवले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना खाली बोलावून घेतले. त्यानंतर उदयनराजेंनी ताटलीमध्ये जमा झालेले सर्व पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.
 
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मला भीक मागायची वेळ आली असेल तर गोरगरीबांची काय अवस्था असेल. सरकारमध्ये इच्छाशक्ती नसेल तर काय करणार. राजेशाही असती तर ही अवस्था आली नसती. लसीकरण केलेल्यांना कोरोना होत आहे. या बाजार बुनग्यांनी बाजार मांडलाय, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. 

ते म्हणाले की, आपण टॅक्स भरतो तेव्हा हे आयजी, कलेक्टर यांचे पगार होतात.  काय विचार न करता लॉकडाऊन करता. ही तुमच्या बापाची इस्टेट आहे का? अशा शब्दात त्यांनी सवाल केला.  लस देऊ शकत नाहीत आणि वरुन पैसे खाता. एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रकरणात एवढे पैसे खाता, लोकांनीही विचार केला पाहिजे.  राजेशाही असती तर मी या सर्वांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, असं उदयनराजे म्हणाले. 

ते म्हणाले की,  एक जगला पाहिजेत, लाख मेलेतरी चालतील असे यांचे धोरण आहे. मी म्हणतो एक मेला तरी चालेल लाख वाचले पाहिजेत.  राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा प्रश्न मिटवावा आणि व्हॅक्सिन द्यावे. 

कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन स्वत:ला खूप शहाणे समजतायत, यांना स्वत:ची बुद्धी दिली आहे की नाही.  माझ्या ताब्यात द्या मी सर्व व्यवस्थित करतो. एका पोलिसांनी जर कोणाला काठी मारली तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉयन ऑर्डर निर्माण होईल. पोलिसांचा आपण आदर करतो म्हणून काय त्यांनी काहीही करावं का, मानला तर देव नाहीतर दगड.  हजार लोकांनी एका पोलिसाला चोपलं तर त्याची हाडं तरी दिसतील का? पोलिसांनी मारलं तर सोडू नका मी तर सोडणार नाही, असंही खासदार उदयनराजे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Embed widget