ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
1. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा संसद भवनावर धडकला, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत इंटरनेट बंद https://tinyurl.com/yc5nnvjv सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले https://tinyurl.com/mwbpun74
2. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक https://tinyurl.com/99dacpp3 जंतर मंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा गंभीर आरोप, अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांची कोणतीही प्रतिक्रिया नाही https://tinyurl.com/yyv6tubm
3. कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, आता आंदोलकांनी हे आंदोलन थांबवावं, जे पी नड्डा यांचं आवाहन https://tinyurl.com/47p46bep मंत्री जे पी नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली आणि 10 मिनिटांची भेट दिली, सीपीजेच्या सौरभ दास यांचा आरोप, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह इतर मागण्या सरकारपुढे ठेवल्या https://tinyurl.com/3mnk8nm3
4. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, पुण्यात विद्यार्थी आक्रमक, मुंबई, पुण्यातील आंदोलनात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी, मुंबईत आंदोलक ताब्यात https://tinyurl.com/yd59rnvy ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे, विनापरवानगी आंदोलन,विविध ठिकाणी आंदोलन आणि वाहतूक कोंडी झाल्यानं अॅक्शन https://tinyurl.com/4pf4zbmb
5. आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांची मागणी https://tinyurl.com/3ka8khc6 आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाजपच्या खासदार कंगना रनौत यांचा संताप https://tinyurl.com/sc67urr2 मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/498j8kj8
6. येत्या आठवडाभरात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता https://tinyurl.com/543c325d
7. पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं, स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना https://tinyurl.com/mr23esff कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं; बुलढाणा जिल्हा हादरला https://tinyurl.com/wvhszshr
8. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, वर्ध्यातील पाच जणांचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/yet2w3z4 महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभरापासून चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, आरोपींना अटक https://tinyurl.com/4z8rerya
9. तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं फुटबॉल विश्वचषकावर नाव, मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं https://tinyurl.com/2avupx36 वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण? https://tinyurl.com/yc28xcvp
10. इंग्लंडविरोधात लॉर्ड्सवरील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 27 धावांनी पराभव, मालिकाही 1-2 अशी गमावली, रोहित शर्माचं शतक व्यर्थ https://tinyurl.com/2avupx36
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
महत्त्वाच्या बातम्या





















