एक्स्प्लोर
प्रेयसीचा कॅन्सरने मृत्यू, महाबळेश्वरला प्रियकराची आत्महत्या
विशाल मित्राकडे जात असल्याचं सांगून बाईकने थेट महाबळेश्वरात आला. त्यानंतर त्याने चार हजार फूटांपेक्षाही खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली.
सातारा : प्रेयसीचा आजारपणातून मृत्यू झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने प्रियकरानेही आयुष्य संपवलं. अहमदनगरचा रहिवासी असलेल्या विशाल गायकरने महाबळेश्वरमध्ये दरीत उडी मारुन आत्महत्या केली.
विशाल गायकर हा अहमदनगरमधील वासुंदे गावातील रहिवासी होता. तो महाविद्यालयात द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होता. अहमदनगरमधीलच कर्जतमध्ये टाकळी ढोकेश्वर गावातील एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबध होते. तिला ब्लड कॅन्सर झाल्यामुळे तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
प्रेयसीचं सोमवारी रुग्णालयात निधन झालं. विशालला ही घटना समजल्यानंतर तो खूप अस्वस्थ होता. तिच्या अंत्यविधीसाठी तो उपस्थितही राहिला. दुसऱ्या दिवशी विधी झाल्यानंतर विशाल मित्राकडे जात असल्याचं घरी सांगून बाईकने थेट महाबळेश्वरात आला. त्यानंतर त्याने चार हजार फूटांपेक्षाही खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement