एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनैतिक संबंधातून सज्जनगडावरुन विवाहितेची प्रियकरासह आत्महत्या
साताऱ्यात बोडकेवाडी या गावात राहणाऱ्या पूनमने गावात राहणाऱ्या निलेशसोबत सज्जनगडावरुन उडी मारुन आत्महत्या केली
सातारा : अनैतिक संबंधांतून विवाहितेने प्रियकरासह सज्जनगडावरुन उडी मारुन आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलाला गडावरच सोडलं. सुरुवातीला, आत्महत्याग्रस्त दोघे हे पती-पत्नी असल्याचं वृत्त होतं.
पाटण तालुक्यातील बोडकेवाडी या गावात राहणारी पूनम चार वर्षांचा लेक देवराज आणि गावात राहणाऱ्या निलेशसोबत सज्जनगडावर फिरण्यासाठी गेली होती. तिघे मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दरीजवळ गेले. पूनमने देवराजला पैसे देऊन खाऊ आणण्यासाठी दुकानात पाठवलं.
चिमुरडा देवराज दुकानात जाताच दोघांनी दरीत उडी मारुन आत्महत्या केली. खाऊ घेऊन आलेल्या देवराजला आई कुठेच न दिसल्यामुळे तो रडत तिथे फिरत राहिला. देवराजला रडताना पाहिल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि बाबाराजे ट्रेकर्स संस्थेच्या मदतीने दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. अनैतिक संबंधातून या दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement