Ashadhi Wari 2022 : विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पालखी सोहळ्यात 25 टक्क्यांनी वाढ : 


या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी वारकरी सहभागी होत असतात. मात्र, यंदा या संख्येत मोठी वाढ झाली असून या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये तब्बल 25% अधिक वारकऱ्यांची वाढ झाली आहे. अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे..


आज लोणी काळभोरहून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने यवतच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. 


साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा - ग्रामस्थांची भावना :


आज तुकाराम महाराजांची पालखी आपल्या गावात येणार या पालखी सोहळ्यातील वारकरी आपल्या दारातून जाणार या भावनेतून गावकरी सकाळपासूनच स्वागतासाठी सज्ज झालेले असतात. घरासमोर रांगोळी काढली जाते. सडा टाकला जातो. सनई चौघडे लावून या वारकऱ्यांचा वाजत गाजत स्वागत केले जाते. आजच्या दिवशी या पालखी मार्गातील गावांमध्ये घराघरांत सणाचे वातावरण पाहायला मिळते. घरासमोर गावकरीसुद्धा या वारीमध्ये असे काही दंग होतात की महिला सुद्धा फुगडी धरतात. लहान मुलांचा देखील पालखी सोहळ्यातील उत्साह पाहण्यासारखा असतो.  


आषाढ वारी वाटेतील गावकरी एक दिवसासाठी बनतात वारकरी


वारीत चालणारे वारकरी हे रोज 15 ते 20 किलोमीटरचे अंतर कसे चालत असतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण एकदा तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालात की तुम्ही किती अंतर कापून मुक्कामी पोहोचलात हे कळतच नाही. म्हणूनच आषाढी वारी ज्या गावातून जाते त्या गावातील गावकरीसुद्धा एका दिवसासाठी वारकरी बनतात आणि आपल्या गावातून दुसऱ्या गावापर्यंत चालत वारकऱ्यांसोबत जाऊन त्यांना निरोप देतात.


महत्वाच्या बातम्या :