Pune Crime News: पहिला विवाह झाला असताना 28 वर्षीय तरुणीला विवाहाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसराती पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली होती. यावरुन आरोपीला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तरुणी पुण्याची रहिवासी असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपीने आणि तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर अनेक दिवस दोघे सोबत राहिले. तरुणीच्या घरी देखील आरोपीची कायम ये-जा असायची शिवाय घरी, गोवा, मुंबईत देखील दोघे फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार केल्याचं तरुणीने सांगितलं आहे. तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विवाह न करता तरुणीची फसवणुक केली, असं तक्रारीत लिहिले आहे. विवाह करणार असं सांगून तिच्यावर बलात्कार केला. सौगभसिंह भदोरीया असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात तरुणीने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. तरुणीची फसवणूक करुन शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला आहे.
व्हॅट्सअप चॅटवरुन धक्कादायक माहिती समोर
पहिला विवाह झाला आहे, असं आरोपीने तरुणीपासून लपवल्याची धक्कादायक माहिती व्हॅट्सअप चॅटवरुन समोर आली आहे. सतत चॅट करत राहत तिच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करत असत. विवाह लपवल्यामुळे तरुणीने अनेकदा फिरायला जाण्यास होकार दिला होता. त्यानुसार ते गोव्याला वगैरे फिरुन देखील आले. मात्र ज्यावेळी तरुणीला जबरदस्ती करत असल्याचा संशय आला. त्यामुळे तरुणीने शारीरीक संबंधासाठी नकार देण्यास सुरुवात केली. मात्र आरोपीने नकार न ऐकता तिच्यावर बलात्कार केला.
सोशल मीडियारुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. पोलिसांनी देखील अनेकदा सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहे. लपवाछपवी, फसवणूक, आर्थिक फसवणुक आणि मॉर्फिंगच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सावध राहणं गरजेचं आहे.