एक्स्प्लोर

इरादे मेरे हमेशा साफ होते है, संजय राऊत यांची सूचक पोस्ट

मुंबई : 'सामना' दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर शिवसेनेकडून किंवा सामना दैनिकाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबूकवर सूचक पोस्ट केली आहे. 'इरादे मेरे हमेशा साफ होते है, इसलिए कई लोग मेरे खिलाफ होते है' अशा आशयाचा मजकूर त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचं आहे, याची चर्चा सुरु झालीय. संजय राऊत अनेक वेळा पेचाच्या विषयांवर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देतात. यावेळी मात्र त्यांनी दोन दिवसांनंतरही मौन बाळगणं पसंत केलं आहे.

‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.  नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

'सामना'तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र

शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन ‘सामना’चा निषेध व्यक्त केला आहे.

‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे

श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी ‘सामना’च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे

मराठा मूक मोर्चाबाबत ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापलं, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील

‘शिवेसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी.’ अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. सामना’ कार्यालयांवर झालेली दगडफेक ही ‘सामना’च्या व्यंगचित्रातून झालेल्या अवमाननेविरोधात मराठा समाजाच्या संतापाचे प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘सामना’च्या व्यंगचित्रामध्ये मराठा मोर्चासह सर्वच समाजातील महिलांचाही अवमान करण्यात आल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
Uddhav Thackeray On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
VIDEO : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
Sugar Industry : साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Mhada Lottery 2026 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Embed widget