सामनातून भाजपवर निशाणा
फोडाफोडीच्या राजकारणावरुन सामनातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. कितीही फिक्सिंग झाले तरी सत्यमेव जयते या ब्रिद वाक्याचा त्यांना पराभव करता येणार नाही. बहुमत सिद्ध होईल त्यावेळी सत्य जिंकल्याचा आनंद महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. असं सामनातून म्हणण्यात आलं आहे. अग्रलेखामधून अजित पवारांनादेखील लक्ष्य करण्यात आलं आहे. भाजपसोबत जाण्याआधी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र राजकारण करायला हवं होतं असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. शरद पवारांनी जे कमावलं तेच चोरुन मीच नेता, माझाच पक्ष असं सांगणं म्हणजे वेडेपणाचा कळस असल्याची टीकाही सामनातून अजित पवारांवर करण्यात आली आहे.
Narayan Rane | ग्रँड हयात हाॅटेलमध्ये 160 नव्हे 130 आमदार : नारायण राणे | ABP Majha
आम्ही 162! ग्रँड हयातमधलं महाविकासआघाडीचं ग्रँड शक्तिप्रदर्शन
"आम्ही -162" या टॅगलाईनखाली महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार सोमवारी एका छताखाली एकवटले आहे. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये 162 आमदारांची ओळख परेड करत महाविकास आघाडीनं शक्तिप्रदर्शन केलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात या तिन्ही पक्षश्रेष्ठींनी सर्व आमदारांना आपणच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास दिलाय. मंगळवाळच्या संविधान दिनाचं औचित्य साधत तीनही पक्षांच्या आमदारांना सोमवारी महाविकासआघाडीसोबत एकजूट राहण्याची शपथ देण्यात आली. महाविकासआघाडीच्या या कार्यक्रमात काँग्रेसचे दिल्लीतले नेते मल्लिकार्जुन खर्गे देखील आवर्जून उपस्थित होते. याशिवाय तिन्ही पक्षांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ग्रँड हयात हॉटेलात आवर्जून हजेरी लावली होती.
We are 162 | आपली लढाई सत्तामेवजयतेची नाही, सत्यमेव जयतेची! - उद्धव ठाकरे | मुंबई | ABP Majha
संबंधीत बातम्या