एक्स्प्लोर
भाजप सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य : राऊत
औरंगाबाद : भाजप सरकार म्हणजे निजामांचा बाप आहे, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद इथे आयोजित मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात निजामांच्या बापाचं राज्य सुरु आहे. 'अच्छे दिन कुठे गेले?, अच्छे दिन आले असतील तर ते खडसे आणि इतर दोन पाच लोकांनाच आले असतील, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
याशिवाय द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या सेलिब्रेशनवरही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही सेलिब्रेशन कसलं करताय, असा सवालही त्यांनी विचारला.
तसंच आता निवडणुका घेतल्या तर सरकार आपलंच येईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement